24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeक्रीडासुमित नागल ४ सेट पर्यंत झुंजला; पराभवानंतरही जिंकले मन

सुमित नागल ४ सेट पर्यंत झुंजला; पराभवानंतरही जिंकले मन

सिडने : ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणा-या सुमित नागलचा अखेर दुस-या फेरीत प्रवास थांबला. त्याचा शँगने ६-२, ३-६, ५-७, ४-६ असा पराभव केला. जरी सुमित पराभूत झाला असला तरी त्याच्या झुंजारवृत्तीची चाहते कौतुक करत आहेत.

सुमितने शँगविरूद्ध आपला पहिला सेट दिमाखात जिंकला होता. सुमितने पहिलाच सेट हा ६-२ असा जिंकल्यानंतर दुस-या सेटमध्ये देखील सुमित दमदार कामगिरी करेल असे वाटते होते. मात्र दुसरा सेट शँगने ३-६ असा खिशात टाकला. सुमितने दुसरा सेट आणि सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी देखील गमावली.

तिस-या सेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सुमितने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र त्याचा ५-७ असा पराभव झाला. दोन सेट जिंकून आघाडी घेतलेल्या शँगने अखेर सुमितची झुंज चौथ्या सेटमध्ये पूर्णपणे संपवली. त्याने चौथा सेट ४-६ असा जिंकला. याचबरोबर सुमितचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील स्वप्नवत प्रवास दुस-या फेरीत थांबला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR