26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयकमी बर्फवृष्टीचा मान्सूनवर उत्तम परिणाम होणार

कमी बर्फवृष्टीचा मान्सूनवर उत्तम परिणाम होणार

नवी दिल्ली/ पुणे : गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात ६ टक्के मान्सून कमी होता. तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर जूनमध्ये पावसात ९ टक्के आणि ऑगस्टमध्ये ३६ टक्के घट झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम महापात्रा यांनी दिली. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. याचा सफरचंद आणि काही पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मात्र शेतक-यांनी फार काळजी करण्याची गरज नाही. यालाही एक सकारात्मक बाजू असून, कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत महापात्रा यांनी व्यक्त केले.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह बहुतेक पर्वतीय राज्यांमध्ये खूपच कमी हिमवर्षाव झाला आहे. सफरचंद सारख्या काही बागायती पिकांसाठी कमी बर्फवृष्टी ही चिंतेची बाब असल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे. मात्र शेतक-यांनी फार काळजी करण्याची गरज नाही. यालाही एक सकारात्मक बाजू आहे. कमी बर्फवृष्टीचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो, ज्यामुळे चांगला पाऊस पडेल. अशा परिस्थितीत एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने पिकांचे बंपर उत्पादन होईल अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितले की, गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेले नाही. पश्चिम हिमालयीन भागाला याचा फटका बसला आहे. त्याच वेळी, दोन सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागात पाऊस झाला. त्यामुळे उत्तराखंड वगळता इतर डोंगराळ राज्यांमध्ये या महिन्यात जवळपास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, यावेळी डोंगरात कमी बर्फवृष्टी झाली, तर पुढचा मान्सून चांगला जाईल, असेही महापात्रा म्हणाले.

गेल्या वर्षी ६ टक्के कमी
गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात मान्सून ६ टक्के कमी होता. जुलै आणि सप्टेंबरमध्ये १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर जूनमध्ये पावसात ९ टक्के आणि ऑगस्टमध्ये ३६ टक्के घट झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑगस्टमधील पाऊस जूनच्या पातळीप्रमाणे झाला असता तर मान्सून सामान्य होऊ शकला असता. कर्नाटक आणि महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागात कमी पाऊस झाला आहे.

एप्रिलमध्ये अंदाज जाहीर होणार
आगामी मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत (जून आणि जुलै) सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. हा कल ऑगस्टपर्यंत चालू राहील. हे अंदाज विश्वसनीय असू शकतात. भारतीय हवामान विभाग एप्रिलच्या मध्यापर्यंत या हंगामाचा पहिला अंदाज जाहीर करेल. या अंदाजानंतरच यावर्षी मान्सूनची स्थिती नेमकी काय राहील याबाबतची माहिती मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR