लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, लातूर जिल्हा अंतर्गत कुणबी-मराठा, मराठा-कुणबी कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी पुर्वीचे अभिलेख उपलब्ध होणाच्या दृष्टिकोनातून पडताळणी करणे सुरु आहे. लातूर शहरातील ज्या नागरीकांकडे १९६७ पुर्वीच्या देवी आजाराच्या लसीकरणाच्या नोंदी असतील तर त्या सादर कराव्यात, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
सन १९६७ पुर्वीच्या कालावधीतील देवी किंवा साथरोगाच्या झालेल्या लसीकरणाची आपल्या व आपल्या पुर्वजांचे नोंदी असलेले अभिलेखे, दस्तावेज, कागदपत्र उपलब्ध असल्यास किंवा आपणास त्या काळातील रेकॉर्डबाबत कांही माहिती असल्यास संबंधीत नागरीक, तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या छायांकीत प्रती आरोग्य अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी, पंडित जवाहरलाल नेहरु रुग्णालय, पटेल चौक (मनपा दवाखाना), लातूर येथे जमा करावी, असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.