अयोध्या : अयोध्येत होणा-या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गायकांनी रामललासाठी खास गाणी रेकॉर्ड केली आहेत. अनेक गाण्यांचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एका जर्मन गायिकेने गायलेल्या गाण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राम आयेंगे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. आता एका जर्मन गायिकेने हे गाणे गाऊन नेटक-यांची मने जिंकून घेतली आहे. जर्मन गायिका कॅसेन्ड्रा स्पीटमेन हिने राम आयेंगे गाण्याचा व्हीडीओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. एका चाहत्याने तिच्याकडे हे गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर स्पीटमैनने हे गाणे गाऊन चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिचे कौतुकही करत आहेत.
स्पीटमैनने गायलेले राम आयेंगे हे गाणे चाहत्यांच्या भलतंच पसंतीस उतरले आहे. या व्हीडीओला आतापर्यंत लाखो व् ूज आणि लाइक्स मिळाले आहे. स्पीटमैनने या आधीही अनेक भक्तीगीतांचे व्हीडीओ शेअर केले आहेत. जर्मन असूनही तिचे भारतावर विशेष प्रेम असल्याचे तिने म्हटले आहे. श्रीहरी स्त्रोतम”, श्री हनुमान मंत्र, गायत्री मंत्र, राधे राधे, हर हर महादेव असे अनेक स्त्रोतांचे व्हीडीओ तिने शेअर केले आहेत.