25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले - उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येत एका बाजूला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले’, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाण्याऐवजी नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील एक्सवरूनच प्रतिक्रिया देताना, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी सुखावली जय श्रीराम, असे म्हटले आहे.

अयोध्येत मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण जगाने तो पाहिला. यावर ठाकरे गटाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, अखेर बाळासाहेबांचे स्वप्­न पूर्ण झाले आहे. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा! अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून, बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचे आणि बलिदानाचे सोने झाले. प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो, असे म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आनंद व्यक्त केला असून, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली, असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR