22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस आता आरक्षण का देत नाहीत? नाना पटोले

फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत? नाना पटोले

पुणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सांगत होते, मग आता ते आरक्षण का देत नाहीत? हे सरकार मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत. ते मुंबईत पोहचले तर काय स्थिती होईल, याचा विचार गृहमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.

श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमासाठी सगळे श्रीमंत लोक उपस्थित होते, पण गरिबांचे सरकारला काही पडले नाही, श्रीराम हा गरिबांचा सुद्धा आहे. हे सरकार लोकांना येडं समजत आहे. पण आधी एकनाथ-देवेंद्र यांचे ‘इडी’ सरकार होते, आता त्यात अजित पवारांचा ए जोडला गेल्याने हे ‘येडा सरकार’ बनले आहे, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली.

उमेदवारीसाठी अंतर्गत सर्वेक्षण

पुण्यात लोकसभेसाठी २० जणांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिल्लीत जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय काँग्रेस कमिटीसह प्रदेश काँग्रेसने देखील अंतर्गत सर्वेक्षण सुरु केले आहे. जो सक्षम उमेदवार असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR