28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधींसमोरच कार्यकर्ते-पोलीस भिडले!

राहुल गांधींसमोरच कार्यकर्ते-पोलीस भिडले!

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गदारोळ

गुवाहाटी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत गदारोळ झाला. आसाममधील गुवाहाटी येथे पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममधील गुवाहाटीमध्ये पुन्हा वादाला तोंड फुटले. शहरात यात्रेला परवानगी न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

गुवाहाटी शहरात यात्रेला परवानगी नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. गुवाहाटीमधील यात्रेचा एंट्री पॉइंट असलेल्या खानापारा येथे कडक सुरक्षा व्यवस्था तसेच बॅरिकेडिंग पोलिसांनी केले होते. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथेच राहुल गांधींच्या यात्रेसोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

दरम्यान १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता २१ मार्च रोजी मुंबईत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR