21.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeपरभणीपरिवर्तनाची सुरूवात स्वत:पासून करावी लागते : प्रा. गणेश शिंदे

परिवर्तनाची सुरूवात स्वत:पासून करावी लागते : प्रा. गणेश शिंदे

जिंतूर : शब्दांमध्ये प्रचंड ताकद असून शब्दाचे सामर्थ्य ओळखता आले पाहिजे. बोलताना शब्द जपून वापरावेत, शब्दामुळे महाभारत घडले, शब्द हे अनमोल ठेवा आहे. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी लागते असे प्रतिपादन व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी केले.

जिंतूर येथे व्हाईस आॅफ मीडिया व प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर, प्राचार्य श्रीधर भोंबे, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक रवीकिरण चांडगे, उद्योजक आर. बी. घोडके, प्राचार्य बळीराम वटाणे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, अ‍ॅड.विनोद राठोड, अ‍ॅड.मनोज सारडा, सुधीर शहाणे, सचिन देवकर, अरुण शहाणे, देवेंद्र भुरे, सत्यनारायण शर्मा, डॉ. देवराव कराळे, गजानन देशमुख, मारुती जुमडे, सिद्धार्थ अच्छा, ज्ञानेश्वर मते, लक्ष्मण बुधवंत, प्रवीण भट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर होते.

यावेळी शिंदे म्हणाले की शब्दांना शेकडो वर्षाचे अधिष्ठान आहे. आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण केला तरच मुलावर योग्य संस्कार निर्माण होऊ शकतात. मुलांनी निसर्ग, समाज, अर्थकारण समजून घेतले पाहिजे. पालकाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलावर पालकांनी दडपण टाकू नये. त्यांच्यामध्ये जे चांगले असेल ते शोधावे तरच खºया अर्थाने येणारी पिढी सशक्त आणि मजबूत तयार होईल. विशेषता मुलींनी पालकाची मान खाली जाईल अशी कोणतेही काम करू नये. पालकाचा जीवनाचा संघर्ष समोर ठेवावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले. आभार प्रदर्शन अ‍ॅड. मनोज सारडा यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे तालुकाध्यक्ष मंचक देशमुख, व्हाईस आॅफ मीडियाचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, नेमिनाथ जैन, प्रशांत मुळी, सचिन रायपत्रीवार, राम रेघाटे, संदीप माहूरकर, नितीन रोकडे, गुलाबराव शिंदे, संतोष तायडे, राजू गारकर, दिलीप माघाडे, राहुल वावळे, नितीन बंगाळे, दिलीप देवकर, शंकर जाधव, माबूदखान आबासाहेब देशमुख, राजाभाऊ काळे आदींनी प्रयत्न केले.

विभागीय पातळीवर पुरस्कार वितरणात पत्रकार मारुती जुमडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकास वार्ता पुरस्कार तर हिंगोली येथील जिल्हा प्रतिनिधी बसंत कुमार भट यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सहकार रत्न पुरस्कार तर उद्योजक आर बी घोडके यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्हॉइस आॅफ मीडिया व प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील सचिन रायपत्रीवार, शकील अहमद, शंकर जाधव, भागवत चव्हाण यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात पत्रकार माबूतखान यांचा अपघात झाल्याने त्यांना आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपये तर पत्रकार रामप्रसाद कंटाळे यांना मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR