16.9 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeक्रीडाअल्लाहने शोएब मलिकला याच पत्नीसोबत आयुष्यभर खुश ठेवावे

अल्लाहने शोएब मलिकला याच पत्नीसोबत आयुष्यभर खुश ठेवावे

शाहिद आफ्रिदीचा शोएबला टोला

नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. शोएबने तिस-यांदा लग्न केले असून आता तो पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाहबंधनात अडकला आहे. या प्रकरणी सानियाच्या वडिलांनी हा ‘खुला’पध्दतीने प्रकरण मिटविले असून सानियाच्या संमतीने सर्वकाही झाले असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, शोएब मलिकला त्याच्या तिस-या लग्नानिमित्त पाकिस्तानचे खेळाडू शुभेच्छा देत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मलिकला शुभेच्छा दिल्या आहेत.
शोएब मलिकला शुभेच्छा देताना आफ्रिदीने म्हटले, ‘शोएब मलिकला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. अल्लाहने त्याला याच पत्नीसोबत आयुष्यभर खुश ठेवावे.’

शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरुवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्वीमिंग पूलमधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR