26.2 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमनोरंजनबहीण मन्नारासाठी प्रियंकाच्या खास शुभेच्छा

बहीण मन्नारासाठी प्रियंकाच्या खास शुभेच्छा

मुंबई : टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. सर्वांचे चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करत आहेत. दरम्यान ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राही बहीण मन्नारा चोप्राला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे.दरम्यान, विकी जैनच्या एलिमिनेशननंतर आता राहिलेले सर्व सदस्य फायनलपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नावर फारुकी, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा यांचा समावेश आहे.

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर चुलत बहीण मन्नारा चोप्राला चीअर करण्यासाठी खास पोस्ट केली आहे. ‘बिग बॉस’मधला मन्नाराचा फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘तू तुझं सर्वोत्तम दे आणि बाकी गोष्टींचा विचार करू नकोस. ूं१स्री ्िरीे मन्नारा’ असे तिने लिहिले आहे. यासोबतच प्रियंकाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तसेच प्रियंकाने कामिनी चोप्रा आणि मिताली हांडा यांना टॅग केलं आहे.

काही दिवसांपूर्वीही प्रियंकाने मन्नारासाठी खास मेसेज दिला होता. मन्नाराची मामी आणि प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांनीही मन्नाराला पाठिंबा दिला आहे. मन्नारा प्रियंका आणि परिणीतीची चुलत बहीण आहे. मन्नाराची आई ज्वेलरी डिझायनर आहे आणि परिणीती-प्रियंकाच्या वडिलांची बहीण आहे. तर मन्नाराचे वडील वकील आहेत. त्यांना आणखी एक मुलगी आहे जिचे नाव मिताली आहे. मन्नाराने तेलुगू, तमिळ, आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केले आहे.

२८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मन्नारा, मुन्नावर आणि अंकिता लोखंडे सर्वांत स्ट्राँग स्पर्धक आहेत. आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR