परभणी : शहरातील गजानन नगरातील ज्ञानेश्वरी महिला मंडळाने मकर संक्रांतीनिमित्त या मंडळातील सदस्य महिला वाण न देता वाणासाठी जमा झालेला निधी गरजू संस्था किंवा व्यक्ती यांना मदत म्हणून देण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून राबवत आहेत. यंदा वाणासाठी जमलेला ५१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील ताडबोरगाव येथील नादब्रम्ह वारकरी शिक्षण संस्थेस मदत म्हणून देण्यात आला.
हा कार्यक्रम दि.२२ जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ओमप्रकाश भंडारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मृदंगाचार्य व किर्तनकार ह.भ.प.श्री. राम महाराज काजळे व विधीज्ञ माधवराव भोसले यांची उपस्थिती होती. प्रभु श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधत प्रभु श्रीराम यांचा जीवनपट, अयोध्येतील श्रीराम जन्मभुमी संघर्षांचा इतिहास व श्रीराम मंदिर प्रतिकृती यातुन समाजास दिशाबोध देण्याचा प्रयत्न केला
. सुजाता भंडारे (माऊली) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या सामाजिक ऋण ध्येयपूर्तीच्या सेवायज्ञाचे सन २०२४ हे १४ वे वर्ष होय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ज्ञानेश्वरी महिला मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.