बीजिंग : चीनच्या जिआंगशी प्रांतातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी भीषण आग लागली. आतापर्यंत, स्थानिक सरकारने २५ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही घटना जिआंगशी प्रांतातील युशुई मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स तळघरात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार आग जंक फूडच्या स्टॉलमधून लागली. येथून १०२ जणांना बाहेर काढण्यात आले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.