27.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनवाज शरीफ यांच्या रॅलीत खरे वाघ आणि सिंह आले!

नवाज शरीफ यांच्या रॅलीत खरे वाघ आणि सिंह आले!

इस्लामाबाद : आर्थिक बजबजपुरी, महागाईने त्रस्त झालेल्या पाकिस्तानात आगळेच घडले आहे. पाकिस्तानात लवकरच सार्वजनिक निवडणुका होत आहेत. पाकिस्तानाचे राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. या पक्षामध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पार्टीने तर सर्वांवर कडी केली. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचे समर्थक जीवंत वाघ आणि सिंह घेऊन आले. त्यामुळे पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या वाघ आणि सिंहासोबत सेल्फी काढत आनंद साजरा केला. पाकिस्तानातील अनोख्या प्रचार रॅलीची जगभर चर्चा होत आहे.

पाकिस्तानातील लाहोर शहरातील नॅशनल असेंबलीवर नवाझ शरीफ यांच्या पक्षाची विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे समर्थक खरे वाघ आणि सिंह घेऊन रॅलीत आल्याने एकच गोंधळ उडाला. हे वाघ आणि सिंह पिंज-यात बंदिस्त असले तरी त्यांना पाहायला आणि त्यांच्या सोबत सेल्फी काढायला कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. एका खुल्या गाडीत या वाघ आणि सिंहाचे पिंजरे ठेवले होते.

नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएलएनचे चिन्ह वाघ आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी थेट वाघाला प्रचार सभेत उतरविल्याचे सांगितले जाते. काही लोकांनी या निर्णयाबद्दल पक्षावर टीका देखील केली आहे.

कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साही प्रकारावर पार्टीचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे वाघ आणि सिंह पुन्हा परत नेण्यात आल्याचे मरयम औरंगजेब यांनी सांगितले. मिडीयातील बातम्यानुसार पीएमएनएलच्या निवडणूक रॅलीत याआधी देखील असली वाघ आणि सिंह आणण्याचा प्रकार झाला होता. या रॅलीत पीएमएलएन नेता आणि नवाझ शरीफ यांची कन्या मरयम नवाझ देखील हजर राहीलेल्या आहेत.

पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला निवडणूक
पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात नवाझ शरीफ यांनी आपण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आणि पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला. आपण जर सत्तेत परत आलो तर पुन्हा देशात सकारात्मक बदल पाहायला मिळतील असे आश्वासन नवाझ शरीफ यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR