कांगाबा : आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांपैकी एक असलेल्या मालेमध्ये सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत ७० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून शोध सुरू आहे.
सरकारच्या राष्ट्रीय भूगर्भशास्त्र आणि खाण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी करीम बार्थे यांनी बुधवारी या दुर्घटनेला दुजोरा दिला. मालीमध्ये अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी खाण दुर्घटना आहे.
खाण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण-पश्चिम कौलिकोरो प्रदेशातील कांगाबा जिल्ह्यात हा अपघात झाला.
आफ्रिकेतील सोन्याचे उत्पादन करणारा तिसरा सर्वात मोठा देश असलेल्या मालेमध्ये असे अपघात सर्रास घडतात. मात्र सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अनेकदा होतो. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सरकारने या प्रभावी यंत्रणा खाण क्षेत्रात आणली पाहिजे, असे बार्थे म्हणाले. खाण मंत्रालयाच्या निवेदनात या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.