मैदाना बाहेरून
हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम वर आज सुरू झालेल्या इंग्लंड विरुद्ध च्या पहिल्या कसोटी सामन्यात साहेबांनी फिरकी पुढे शरणागती पत्करली. इंग्लिश संघाने तीन मंद गती गोलंदाज खेळवले. टीम इंडियान साहेबांचा संघ अवघ्या६५ षटकात अडीचशे धावात गुंडाळला. खरं तर त्यापेक्षा आणखी कमी धावा साहेबांच्या खात्यात लागण्याची व्हावयाची गरज होती.
कारण नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टॉक्स ने फलंदाजी स्वीकारली साहेबांच्या सलामी वीरांनी पहिल्या बारा षटकातच अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर आलेल्या गोलंदाजाने साहेबांवर वर्चस्व मिळवले त्यांची मधली फळी ढेपाळली. रविचंद्रन अश्विन(३) रवींद्र जडेजा (३)आणि अक्षर पटेल (२)यांनी साहेबांच्या फलंदाजांना नामोहरम केले साहेबांच्या कर्णधार स्ट्रोक्स(७०) ने मात्र कर्णधाराची खेळी करत आपल्या संघाला अडीचशे पर्यंत मजल मारून दिली.
उरलेल्या तेवीस षटकात टीम इंडियाने एक बाद११९धावा जमवल्या आहेत त्यांना पहिल्या डावात बरोबरी करण्यासाठी १२७ धावांची गरज आहे सलामी वीर यशस्वी जयस्वाल ७६ धावांवर खेळत आहे त्यामुळे दुस-या दिवशी त्याच्या शतकाची अपेक्षा आहे साहेबांनी पहिल्या बारा षटकात ५५ धावा केल्या तर यजमानानी तेवढ्याच षटकात एक बाद ऐंशी धावा केल्या होत्या.
यावरून असे दिसते की कसोटी प्रमाणे खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी करण्याचा विचार दोन्ही संघांकडे दिसत नाही. खरे तर पाच दिवसाचे कसोटी क्रिकेट म्हणजेच तंत्रशुद्ध खेळ आहे.
सध्या कसोटी मध्ये सर्व खेळाडू टी-ट्वेंटी प्रमाणे झटपट फलंदाजीच्या मागे लागतात आणि आपलं नियंत्रण खेळावरून घालवतात ज्या वेळेला पाच दिवसाची कसोटी पाहण्यासाठी प्रेक्षक येतात तेव्हा त्यांना तंत्रशुद्ध फलंदाजी पाहण्यास मिळतच नाही आणि खेळही पाच दिवस चालत नाही. हा प्रेक्षकांवर अन्याय आहे .
चाळीस वर्षांपूर्वीचे गावस्कर वेंगसरकर लक्ष्मण पुजारा रहाणे यांच्यासारखी फलंदाजी सध्या दुर्मिळ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील गत कसोटी दोन दिवसातच संपली होती कसोटी ही कसोटी प्रमाणे खेळली गेली तरच जुने .खिलाडू वृत्तीचे क्रिकेट शिल्लक राहील या वेगवान जगात साडेतीन तासात सामना संपतो तर आता दहा षटकांची सामने चालू होणार असे ऐकले मग तर गोलंदाजां चा सुपडासाफच होणार.
(डॉ राजेंद्र भस्मे)