24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयसणासुदीत महागाई फोफावली!

सणासुदीत महागाई फोफावली!

युद्धाचा बाजारपेठेवर परिणाम इंधन महागल्याने दरवाढीचे चटके

नवी दिल्ली : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाला आता महिना पूर्ण होत आहे. या युध्दात आतापर्यंत १० हजारहून अधिक जण यात मारले गेले. आंतरराष्ट्रीय संघटनांनी युद्ध मिटावे यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने युद्ध असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. तेलच नव्हे खाण्या-पिणेही महागेल असा इशारा दिला होता. जागतिक बँकेच्या कमोडीटी मार्केट आऊटलुकमध्ये ही बाब समोर आली आहे.

यामुळे जागतिक स्तरावर खनिजतेलाच्या पुरवठा साखळीला फटका बसून जगभर तेलाचे भाव भडकू शकतात. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होऊ शकतात, असे म्हटले आहे. हे युद्ध दीर्घ काळ चालल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्यांदाच विजेचे दुहेरी संकट निर्माण होणार असल्याची शक्यता जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंदरमित गिल यांनी वर्तविली आहे. युद्धामुळे खनिजतेल महागल्याने जगभरात खाद्यपदार्थही महागणार आहेत. खाद्य महागाई दर वाढल्याने विकसनशील देश सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. युद्धामुळे या देशांसमोरील अडचणींमध्ये आणखी भर पडू शकते. असे जागतिक बँकेचे उपमुख्य अर्थतज्ज्ञ अहान कोसे यांनी म्हटले आहे. वस्तूंचे दर ऐन दिवाळीत ऐन दिवाळीन सर्वसामान्य गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. पावसामुळे उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती घाऊक व्यापारी देतात. तर एपीएमसीत गुळ, साखर, रवा, मैदा, बेसण किलोमागे पाच ते दहा रुपयांनी तर किरकोळ बाजारात पाच ते १५ रुपयांनी किलोमागे दरवाढ झाली आहे.

फराळ ४० टक्क्यांनी महागला
ऐन दिवाळी सणासुदीच्या तोंडावर सुकामेवा, रवा, मैदा, बेसन, पोहे, गुळ, साखर, खोब-यासह डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ३५ ते ४० टक्क्यांनी फराळाच्या वस्तूसह जीवनाश्यक वस्तू महागल्या आहेत. तुरडाळ १९० तर इतर सर्व डाळी १२० ते १४० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. तर एपीएमसी घाऊक बाजारात हीच दरवाढ दहा टक्के इतकी आहे. फराळासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने रेडीमेड फराळाचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत किलोमागे १०० ते १२० रुपयांनी महागले आहेत.

डाळी कडाडल्या
किरकोळ बाजारात तुरडाळ कडाडली आहेच शिवाय इतर डाळींचे दर १२० ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात किलोमागे ४० ते ४५ रुपये सर्वसामान्यांना एक किलो डाळीसाठी जादा मोजावे लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह रायगड जिल्ह्यांत रोज किमान ११० गाडी डाळींचा पुरवठा एपीएमसी घाऊक बाजारातून होते. एपीएमसीतील घाऊक दाणा बाजारामध्ये डाळींची आवक काही प्रमाणात घटली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR