22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष

‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष

मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, ‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष केला जात आहे. डीजेच्या तालावर नाचत मराठा आंदोलक आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत.

‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर शनिवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली. यावेळी जरांगे यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे यासाठी मोठ्या प्रमाणात गुलाल देखील आणण्यात आला होता. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठे यश आले आहे. त्यामुळे आज राज्यभरात मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

जेसीबीतून पुष्पवृष्टी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठे यश मिळाल्याने मराठा समाजाच्या वतीने जल्लोष केला जात आहे. विशेष म्हणजे, वाशी येथे सभेच्या ठिकाणी सात ते आठ जेसीबी लावण्यात आले होते या जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली गेली.

लोणावळ्यात गुलालाची उधळण…
मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. याचा आनंद आता गावागावांत साजरा व्हायला लागला आहे. पुण्यातील लोणावळ्यात जिथे मुंबईत दाखल होण्यापूर्वी विराट सभा झाली होती, तिथेही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. गुलालाची उधळण करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR