अहमदनगर : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. कंटनेरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. अपघातामध्ये आई-वडिलांसह दोन भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणा-या कंटेनरने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकीवरील प्रवासी धाडकन खाली कोसळले. त्यापैकी एका दुचाकीवरून आई-वडील, मुलगा आणि मुलगी असे एकाच कुटुंबातील चार जण बाहेर जात होते, त्यांचा सर्वांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
तर दुस-याा दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार घटनास्थळावरून लगेच फरार झाला. जखमी रुग्णावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.