24.9 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक

 महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश

नवी दिल्ली : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या २७ मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर २६ मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५६ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण ६ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत आहे. २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणा-या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणा-या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचे तिकीट त्यांना मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार…

प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन, वंदना चव्हाण

२९ फेब्रुवारीला चित्र होणार स्पष्ट

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांची एकूण प्रक्रिया २७ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. २९ फेब्रुवारीला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल मधील खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत आहे. ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२३ ला संपणार आहे.

भाजपचे ६० खासदार निवृत्त होणार

राज्यसभेतून निवृत्त होणा-या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच, तब्बल ६० खासदार भाजपचेच आहेत. यापैकील ५७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणा-या भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावांचा समावेश होतो.
…………………………………………..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR