18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeउद्योगजर्मनीत १ फेब्रुवारीपासून ४ दिवसांचा आठवडा!

जर्मनीत १ फेब्रुवारीपासून ४ दिवसांचा आठवडा!

अर्थकारणाला उभारी देण्याचा प्रयत्न, नोकरकपातीमुळे तीव्र असंतोषाची लाट

बर्लिन : जर्मनीची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. त्यामुळे जर्मन अर्थव्यवस्था संथ झाली आहे, ही देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर्मनीमध्ये मोठमोठ्या कंपन्यामध्ये नोकरकपातीचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जर्मन अर्थव्यवस्थेला गती मिळावी, यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जर्मनीमधील कंपन्यांनी कर्मचा-यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून चार दिवसांचा आठवडा सुरु करण्याचा निर्णय जर्मनीतील ४५ कंपन्यांनी घेतला आहे.

आठवड्यात चार दिवस काम

जर्मनीमधील कर्मचा-यांसाठी आठवड्यातून फक्त चार दिवसांचे काम असणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांना आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

येत्या १ फेब्रुवारीपासून कर्मचा-यांना तीन दिवस ऑफ मिळणार आहे.

६ महिन्यांसाठी निर्णय लागू

जर्मनीमध्ये कर्मचा-यांसाठी आठवड्यातून चार दिवस कामाचा निर्णय सहा महिन्यांसाठी करण्यात आला आहे. सहा महिन्यानंतर निष्कर्ष काढल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

चार दिवसांचा आठवडा करण्याचे कारण…

कंपनीचे उत्पादन वाढवणे, कर्मचा-याच्या सुट्ट्या कमी करणे. तणाव, आजारपण किंवा बर्नआउटमुळे घेतल्या जाणा-या सुट्ट्या कमी करणे. यामुळे कंपन्यांचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जर्मनीमध्ये चार दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला.

पगार किती मिळणार?

आठवड्यात फक्त चार दिवस काम केले तरी पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. कर्मचा-यांना आधी मिळत होता, तेवढाच पगार मिळेल. कर्मचारी समान वेतनासाठी दर आठवड्याला कमी तास काम करतील. म्हणजेच चार दिवसांचा आठवडा झाला तरी कामाचे तासही आधीसारखेच राहतील. पण कर्मचा-यांचे आऊटपूट सारखेच राहणार आहे.

आतापर्यंत अर्थव्यवस्थेचे नुकसान किती?

फेडरल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ नुसार, वर्ष २०२२ मध्ये जर्मन लोक महिन्याचे सरासरी २१.३ दिवसही काम करू शकले नाहीत, ज्यामुळे २०७ अब्ज युरो (अंदाजे १८६५५८७ कोटी २६ लाख ६० हजार ९०० रुपये) चे नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR