19.3 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeसोलापूरअधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील : आ. राऊत

अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील : आ. राऊत

बाशीं – सध्या कोणत्याही क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धे च्या युगात शेतकन्यांनीही नवतंत्रज्ञान अवगत करुन अधिकाधिक उत्पन्न घेवून आपली प्रगती साधावी, असे आवाहन करत बार्शी तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी गती दिल्याबद्दल आयोजित सत्काराला उत्तर देताना शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. येथील विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्था, विठ्ठल एजन्सीज व आयडॉल फिटिंग्ज अ‍ॅण्ड इरिगेशन यांच्या

संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे (स्व.) खासेराव पाटील, (स्व.) कल्याणराव पाटील व (स्व.) चंद्रकांत पाटील फार्म हाऊस येथे या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विधिज्ञ परशुराम करंजकर होते. आ. राऊत म्हणाले, जिल्ह्यातील इतर भागातील हिरवीगार शेती पाहून आपल्या भागातील शेतीसुद्धा अशी हिरवीगार होऊन शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, असे मनोमन वाटायचे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरु केले. बार्शी उपसा सिंचन योजनेला गती देण्याबरोबरच तालुक्यात साठवण तलावांची निर्मिती, आवश्यक ठिकाणी बंधारे निर्मिती, नदी, नाले, ओढे यांचे लोकसहभागातून रुंदीकरण याला प्राधान्य देवून तालुक्यात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

कृषी उद्योग मार्गदर्शक अनमोल वाधम म्हणाले, शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांसोबत प्रक्रिया उद्योग आणि वाढत्या जागतिकीकरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतीकडे जगण्याचे साधन म्हणून नव्हे तर उद्योग म्हणून पहा. आपली मानसिकता बदला. काय पिकतंय यापेक्षा काय विकतंय याचा विचार करा. शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्या योजनांची माहिती घेऊन आपली उन्नती साधा असा मंत्र त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आयडॉल कंपनीचे राज्य व्यवस्थापक अभिजीत गुंड यांनीही कंपनीच्या उत्पादनांची माहिती दिली.

यावेळी बार्शी उपसा सिंचन योजनेला गती दिल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण करंजकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर माजी गटनेते दीपक राऊत, हनुमंत जामदार, भगवंत पतसंस्थेचे जनरल मॅनेजर अनिल बनसोडे, पतसंस्थेचे व्हा चेअरमन श्रीकांत शिंदे, संचालक यशवंत पाटील, प्रशांत क्षीरसागर, शाखाधिकारी युवराज नारकर, गणेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन म हेश शिंदे यांनी केले. शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कैलास शिंदे, सुरज गरदडे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR