27.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeसोलापूरबापानेच स्वतः च्याच मुलाला विष घालून जीवे मारले

बापानेच स्वतः च्याच मुलाला विष घालून जीवे मारले

सोलापूर : शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंक्स मध्ये विष घालून जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनानी हादरून गेले आहे. सकाळी तीन जिवलग मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले. त्या घटनेने सोलापूर हळूहळून निघाले. याचं दुःख संपते ना लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली.

दिनांक १३/०१/२०२४ रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचे मृतदेह मिळून आले होते. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होत. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय- १४ वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर अशी पटली. आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनस्थळ पर्यंतचे ूू३५ फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादी चे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरुन वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेवून जावुन त्यास थम्सअप मध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजुन जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोनि जगताप हे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR