सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रैस पार्टीच्या वतीने मंगळवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त रेल्वे स्टेशन चौक परिसरात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस ज्येष्ठ नेते शफी ईनामदार ,अनिल उकरंङे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून सोङला होता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान त्याग आणि त्यांचे विचार आजरामर राहतील असे प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ नेते शफी ईनामदार व अनिल उकरंङे यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,ज्येष्ठ नेते शफी ईनामदार ,अनिल उकरंङे,फारुक मटके ,प्रमोद भोसले ,अमिर शेख, राजू बेळेनौर संजय मोरे ,अनिल बनसोडे तन्वीर गुलजार ,रुपेश भोसले , वैभव गंगणे छञबंद ,पवन पाटील,शामराव गांगर्ङे,सोमनाथ शिंदे दत्ता वाघमोङे,यशराज ङोळसे,ओम सपकाळे ,दशरथ पवार,मार्तँङ शिनगारे,किरण भीषेकर,संजय सांगळे, महीला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष कदम ,किरण सायरा शेख,शशिकला कस्पटे किरण मोहोते,विनायक कदम ,शंकर पुजारी यांची उपस्थिती होती.