33 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeसोलापूरकिसन जाधव यांनी घेतली प्रा. शिवाजी सावंत यांची भेट

किसन जाधव यांनी घेतली प्रा. शिवाजी सावंत यांची भेट

सोलापूर / प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रकपदी निवड झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आणि आपले प्रश्न मार्गी लावून घेतले. प्रा. सावंत यांच्या भेटीनंतर जाधव म्हणाले, प्रा. शिवाजी सावंत है तो सब कुछ मुमकिन है ! यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा व शहर नूतन कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याअनुषंगाने किसन जाधव यांनी आपल्या भागातील हजारो महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे. त्या शिबिरात सहभागी महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रमही त्यांनी घेतला आहे. त्या कार्यक्रमाला स्वतः ना. अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR