31.9 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीयसंसद सुरक्षा प्रकरण; कबुलीजबाब देण्यासाठी दिले विजेचे शॉक!

संसद सुरक्षा प्रकरण; कबुलीजबाब देण्यासाठी दिले विजेचे शॉक!

नवी दिल्ली : सदेच्या सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींपैकी ५ आरोपींनी पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. आरोपींनी त्यांच्या याचिकेत मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आणि राजकीय संघटनांशी संबंध मान्य करण्यासाठी त्यांना विजेचे शॉक देण्यात आले. त्यांची ७० कोऱ्या पानांवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि एका राजकीय पक्षाचे नाव घेण्यासाठी भाग पाडण्यात आले. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून केला जात आहे.

१३ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेत एक अनपेक्षित घटना घडली. येथील व्हिजिटर गॅलरीतून दोन जणांनी लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली होती. त्यांच्याकडे काही डबे होते ज्यातून रंगीत धूर निघत होता. याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित केले होते. संसदेत या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने विरोधी पक्षाच्या खासदारांना राज्यसभा आणि लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR