34.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीयप्रशांत कुमार बनले यूपीचे प्रभारी डीजीपी

प्रशांत कुमार बनले यूपीचे प्रभारी डीजीपी

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांची प्रभारी (कार्यवाहक) पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. प्रशांत कुमार हे सध्याचे कार्यकारी डीजीपी विजय कुमार यांची जागा घेतील जे बुधवारी निवृत्त झाले आहेत. याबाबत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशला पुन्हा एकदा कार्यवाहक डीजीपी मिळणार आहे. जनता विचारात आहे की, दिल्ली-लखनौमधील संघर्षामुळे की प्रत्येक वेळी कार्यवाहक डीजीपी बनवण्याचा खेळ खेळला जात आहे का? किंवा गुन्हेगारांसोबत संगनमताने सत्तेची वाटणीसाठी असे केले जात आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, “प्रशांत कुमार यांची उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यवाहक पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा यूपी सरकारने प्रभारी डीजीपीची नियुक्ती केली आहे. ११ मे २०२२ रोजी तत्कालीन डीजीपी मुकुल गोयल यांना “विभागीय कामात रस नसल्यामुळे आणि अक्षमतेमुळे” काढून टाकण्यात आले, तेव्हापासून या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR