सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन येथे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करणारे स्टॉल धारक फेरीवाले ढकल गाडीवाले टेंडर भरून व्यवसाय करत असल्याचे कळते परंतु सोलापूर शहरातील बेरोजगार तरुणांची कोंडी होत असून याठिकाणी स्थानिक तरुणांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्यांकांचे नेते राशिद शेख व गौतम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सोलापूर रेल्वे मंडल अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी छ. शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख इंटकचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज कंपली अस्लम शेख नीता सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अपस्थित होते.
पाणी बिस्कीट वडापाव असे दर्जेदार अनेक जीवनावश्यक वस्तूची विक्री करणे हा गुन्हा ठरत नाही परंतु अधिकृत आणि अनधिकृत या कात्रीत हा वर्ग भरडला जात आहे. त्यास कधी कधी चहा पाणी अन्य वस्तू विनापरवाना विकल्याच्या नावाखाली त्याच्यावर गुन्हे दाखल होत असल्याने अनेक बेरोजगार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु ज्या तरुणाकडे लायसन्स नाही अश्या तरुणावर गुन्हे दाखल केल्याने गरीब बेरोजगार तरुणावर एकप्रकारे अन्याय होत असून आधुनिक भारत रेल्वे असंघटित कामगार संस्थेच्या वतीने सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार स्वयंरोजगार मिळण्यासाठी त्यांना व्यावसायिक पाठबळ रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावे व तसे प्रत्येक फेरीवाले स्टॉल धारक यांना ओळखपत्रे देण्यात यावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.