25.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारची परिस्थिती ‘दोन बायका आणि फजिती ऐका’ सारखी

सरकारची परिस्थिती ‘दोन बायका आणि फजिती ऐका’ सारखी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे तीन रंगाचे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका, असा हल्लाबोल खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती आहे. चोरी, दरोड्यांसह इतर गुन्हेदेखील वाढत आहेत. या सरकारमध्ये काय चालले आहे? हे तीन रंगाचे हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका अशी आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार ५० कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील सर्वांवर त्यांनी टीका केली. सरकारमधील बेरोजगारी कमी झाली. मात्र,राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढली, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR