25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रस्वत:ला राजे समजणा-यांना जनतेने घरी बसवावे

स्वत:ला राजे समजणा-यांना जनतेने घरी बसवावे

बीड : उल्हासनगरची घटना दुर्दैवी आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे घसरली आहे. जिथे मसल पॉवर नव्हतं, तिथे मसल पॉवर यायला लागले, सत्ता हा पैसा असेच जोडले. या घटनेचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे. तुमचे लोकशाहीत कितीही मतभेद असले तरी तुम्ही राजे नाही. तुम्हाला लोक राजे बनवतात. तेव्हा लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे स्वत:ला राजे समजायला लागलेत अशांना घरी बसवावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले.

बीड येथे पत्रकारांशी प्रकाश आंबेडकरांनी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, एक-दोन घटनेवरून गृहमंत्री अपयशी झालेत की पूर्ण यंत्रणा कोलमडली आहे हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी घटना घडली त्यानंतर राजीनामा द्यावा अशी मागणी होते. परंतु ती घटना घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतरही अशा घटना घडल्या तर ते अपयशी ठरतायेत असं म्हणता येईल असं त्यांनी सांगितले.

तर बीड येथे संताचा कार्यक्रम आहोत. त्यामुळे कुणी ना कुणी येणारच. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस येतायेत. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय हे बोलणे अर्थ नाही. या घटनेतून फार अर्थ काढण्याची गरज नाही. मला जे काही करायचे ते उघड करत असतो. मला भाजपासोबत जायचे असे आमच्या पक्षाने ठरवले तर थांबवणार कोण?. पण मागच्या दाराने, पडद्यामागे, टेबलाखाली असे राजकारण करत नाही. जे आहे ते लोकांसमोर, पारदर्शकतेने करतो. म्हणून वंचित बहुजन आघाडीवर लोकांचा विश्वास आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR