कळंब : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील ईटकूर येथे गांजाची लागवड करणा-या शेतक-याच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी शेतात छापा टाकून कारवाई करीत असताना शेतकरी फरार झाला आहे. दशरथ संपत्ती काळे असे गुन्हा दाखल झालेल्या शेतक-याचे नाव आहे.
ईटकूर ता. कळंब येथील कान्हेरवाडी रस्त्यावर सहा गुंटे शेतात लागवड केलेला ६० लाख रुपये किमतीचा गांजा कळंब पोलिसांनी पकडला. या प्रकरणी पोलीसांनी दशरथ संपत्ती काळे (वय ५८) रा. इटकूर यांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल झालेले शेतकरी फरार झाले आहेत.
ईटकूर शिवारातील कन्हेरवाडी रस्त्यावर एका शेतक-याने सहा गुंठे शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत कळंब पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कळंब ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील कोळेकर यांच्यासह पोलिस पाटील श्री. जगताप हे इटकूर येथील दशरथ संपती काळे यांच्या जमीन गट नंबर ६६६ मध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी लहान, मोठी गांजाची झाडे मिळून आली. जवळपास ६० लाख रुपये गांजाच्या झाडाची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.