25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयमुलींना छेडले तर ‘राम नाम सत्य है!

मुलींना छेडले तर ‘राम नाम सत्य है!

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलींची छेड काढणा-यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जर कोणी महिलांसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, बहिणीची किंवा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तर पुढील चौकात पोलिस त्याला पकडतील, असे त्यांनी सांगितले. कबीर मगर महोत्सवाच्या समारोप समारंभात ६०० जोडप्यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३६० कोटी रुपयांच्या ११४ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देताना योगी म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी महिलेची छेड काढली तर पोलीस लगेचच त्याला त्याच्या पुढील चौकात पकडतील. लक्षात ठेवा की, जर कुणी महिलेचीकिंवा बहिणीची छेड काढली तर ‘राम नाम सत्य है’ झाले म्हणून समजा. सामूहिक विवाह योजना आणि सरकारच्या इतर योजनांबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारच्या या कल्याणकारी योजना लोकांच्या जीवनात बदल घडवणारे महत्त्वाचे घटक बनत आहेत. आम्ही या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि बस स्टॉपसाठी रस्ते बांधण्यासाठी जमिनीचा शोध घेत आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कमांड एकात्मिक सेंटर बांधले जात आहे. याद्वारे संपूर्ण जिल्ह्यावर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवता येईल. त्यामुळे जर कोणी महिला किंवा मुलीचा विनयभंग करण्याचा अथवा चोरी किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, तर पुढच्या चौकात पोहोचेपर्यंत पोलिस त्यांचे ‘राम नाम सत्य है’ करतील.

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याला दाद देताना योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान होण्याची संधी द्या जेणेकरून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असे आवाहन योगींनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR