सोलापूर : सोशल मिडिया च्या दुनियेत आज सगळ्या कडे मोबाईल आहे जर घऱात पालक च तास न तास मोबाईल वर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत असतात त्यामुळे लहान मुलाना मोबाईल पासुन दूर ठेवा असे प्रतिपादन बालरोग तञ्ज डॉ विशाल आंधळंकर यांनी केलें
कै नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित बाळे येथील एन के किड्स स्कूल मध्ये विद्यार्थांचे आरोग्य तपासणी शिबिर उदघाटन प्रसंगी ते बोलत होतें यावेळी फार्मासिस्ट योगीराज चाफेकर व संस्थेचे ट्रस्टी विकास कस्तुरे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ म्हणाले कीं मुलांना टिफिन मध्ये मैगी बिस्किट कुरकुरे न देता चपाती भाजी चा सकस आहार दया म्हणजे मुले आजारी पडणार नाहीत.
प्रथमतः कै नागेश करजगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यपिका श्वेता कस्तुरे, दिपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन कोमल अदलिगे पूनम कळसाइत संगीता हेगडकर यांच्या सह विदयार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होतें