सेलू : शहरातील नूतन विद्यालय परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र शासनाचे वतीने घेण्यात येणा-या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत इंटरमिजिएट ग्रेड नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी कु.परिमल सोलापूरे हीला ए ग्रेड प्राप्त झाला तर यश प्रकाश लिपने, प्रथमेश मानवतकर, सुमेध कापसे, सिद्धांत नागरे, प्रगती मगर, तृप्ती पंडित, प्रथमेश मोटे यांना बी ग्रेड प्राप्त झाला. यावर्षी शाळेचा निकाल ८७ टक्के लागला आहे.
कला क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्र. मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के के देशपांडे, डी. डी.सोन्नेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर. डी. कटारे, कलाशिक्षक फुलसिंग गावित, केशव डहाळे आदींनी पुढाकार घेतला.