जिंतूर : शहरातील परभणी रोडवरील साई मैदानावर दि. १२ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत चाललेल्या नमो चषक अंतीम सामना न्यू खिलाडी क्रिकेट संघ जिंतूर विरुद्ध बामणी क्रिकेट संघ यांच्यात झाला. एक तर्फी झालेल्या सामन्यात न्यू खिलाडी संघाने बाजी मारत नमो चषकाचा मानकरी ठरला तर बामणी संघाला द्वितीय स्थान, तृतीय स्थान केहाळेश्वर क्रिकेट क्लबने पटकावले. विजेत्या तीन्ही संघाला चषक, बक्षिसांची रोख रक्कम माजी नगराध्यक्ष सचिन (मुन्ना) गोरेसह व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
जिंतूर- सेलू विधानसभेच्या भाजप आ. मेघना बोर्डीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा ग्रामीण तालुकाध्यक्ष माधव दराडे यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ जानेवारी रोजी शहरातील साई मैदानावर नमो चषकाच्या पहिल्या सामन्याचे उद्घाटन आ. मेघना (साकोरे ) बोर्डीकर, भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धात शहरी व ग्रामीण भागातील तब्बल १२० क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.
संपूर्ण सामने पाहण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दि.२ फेब्रुवारी रोजी अंतीम सामान्याची नानेफेक माजी नगराध्यक्ष सचिन (मुन्ना) गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अॅड. विनोद राठोड, माजी नगरसेवक अॅड. गोपाळ रोकडे, डॉ.पंडीत दराडे, जेपीएल आयोजक संदिप लकडे, वाळके, गायकवाड, अशोक बुधवंत, अमोल देशमुख, कान्हा तळेकर आदींची उपस्थिती होती.
अंतीम सामान्यत न्यू खिलाडी संघाने ८ षटकांत २ खेळाडूच्या बदल्यात ९९ धाव करत बामणी संघाला १०० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बामणीचा पुर्ण स़ंघाने केवळ ४६ धावा केल्याने न्यू खिलाडी संघाने बाजी मारली. सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रथम पुरस्कार न्यू खिलाडी संघाचे कर्णधार खालेद बेग मिर्झा, उपकर्णधार म.तहा यांना नमो चषक व रोख ३१ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार बामणी क्रिकेट क्लबला नमो चषक व रोख २१ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक केहाळ संघाला चषक व रोख ११ हजार रुपये तीन्ही संघाच्या कर्णधाराना देण्यात आले आहे. सर्व सामान्यचे पंच म्हणून क्रिडा मार्गदर्शक शेख शाहरुख, गणराज गायकवाड, शेख जावीद, डॉ.विनोद राठोड होते. अंतीम सामन्याचे समालोचन शेख अलीम, सुशांत भोसले, नितीन चव्हाण यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक माधव दराडे, अमोल देशमुख, अक्षय जयभाय, अमोल जाधव, शेख अझहरसह भाजप युवा मोर्चाच्या सर्व पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले होते.