15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयपूर्ण राज्याचा दर्जा द्या, लडाखमध्ये आंदोलन

पूर्ण राज्याचा दर्जा द्या, लडाखमध्ये आंदोलन

जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरपासून वेगळा करत केंद्रशासित प्रदेश लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. या मागणीसाठी लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीत मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. सहाव्या अनुसूची अंतर्गत केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी संपूर्ण लद्दाख बंद ठेवण्यात आले. लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

लेहमध्ये सध्या कडाक्याची थंडी असतानादेखील हजारो लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामध्ये महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी लडाखला राज्याचा दर्जा द्यावा, राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करावी आणि लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र संसदीय जागा मिळाव्यात, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. याआधीही लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली होती. मात्र, त्याआधी लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या प्रतिनिधींसोबत चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. असे असतानाही लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि परिसरात संप पुकारण्यात आला. लडाखच्या लोकांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच राज्यमंत्री (गृह व्यवहार) नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR