नवी दिल्ली : दीप्ती आर पिन्निती ज्यांनी विविध युट्यूब व्हिडिओवर दावा केला होता की श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल भारत आणि यूएई सरकार यांच्यात लपवाछपवी करण्यात आली होती. मात्र ती बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोप करत होती, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने आता भुवनेश्वरस्थित दीप्तीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ती स्वत:ला खासगी गुप्तहेर असल्याचे देखील सांगत होती.
दीप्तीने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबतही असाच खळबळजनक दावा केला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा दुबईत मृत्यू झाला होता. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या खोलीच्या गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला होता.
विशेष न्यायालयात सादर केलेल्या सीबीआयच्या अहवालानुसार, यूट्यूबवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. सीबीआयने पिन्निती आणि कामथ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत १२०-बी (गुन्हेगारी कट), ४६५, ४६९ आणि ४७१ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.