बारामती : बारामती शहरातील मध्य बाजारपेठेत सिनेमा रोडवरील एका लॉजमध्ये आज एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा विनोद भोसले ( वय ३६, रा. सोनवडी, ता. दौंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत तिचा पती विनोद भोसले हा देखील या लॉजमध्ये पत्नी सोबत उतरला होता. तिचा खून करून पती फरार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
पती ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे खरे कारण समजू शकणार आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी दवाखान्यात नेण्यात आला आहे. पतीने पत्नीचा कौटुंबिक वादातून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.