27.3 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रकमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार

कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश

मुंबई : प्रमुख शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खानदेशात सध्या कापूस, सोयाबीन व मका या शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. दरम्यान एमएसपीपेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे २० निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईकरांना खूशखबर मिळाली. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. याशिवाय शेतकरी आणि वयोवृद्धांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ….

– मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही.

– राज्यात २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

– ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार.

– सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार.

– उत्पन्नवाढीसाठी शेतक-यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.

– मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार.

– पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी.

– बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार.

– शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी.

– धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.

– सेवानिवृत्त न्यायिक अधिका-यांना सुधारित भत्ते.

– स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.

– बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.

– कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता.

– तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.

– नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम.

– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार.

– कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६० वर्ष.

– सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय.

– गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR