30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeराष्ट्रीय१२ वर्षे बायकोला घरात ठेवले डांबून

१२ वर्षे बायकोला घरात ठेवले डांबून

म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल १२ वर्षे घरातील एका खोलीत डांबून ठेवले होते. पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने पोलिसांना संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे. मात्र, महिलेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील म्हैसूरचे आहे. एका महिलेची पोलिसांनी सुटका केली, जिला तिच्या पतीने १२ वर्षांपासून घरात कोंडून ठेवले होते. ३० वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितले की, पतीने १२ वर्षांपासून घरात कोंडून ठेवले होते. तिने टॉयलेटसाठी खोलीतील एक छोट्या बॉक्सचा वापर केला. महिलेला दोन मुले आहेत. मुले शाळेतून परतली की घराबाहेर थांबायची आणि नवरा कामावरून परतला की मुले आत यायची.

या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, ही महिला घरात कैद होती. तिच्या हालचालींवर मर्यादा होत्या. कामावर जाण्यापूर्वी नवरा तिला घरात कोंडून ठेवायचा. त्याला असुरक्षित वाटायचे. त्याचे आता समुपदेशन करण्यात आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळ गाठून महिलेची सुटका केली. महिलेचे ही समुपदेशन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR