सोलापूर : शहरातील मोकाट जनावरांमुळे रोज अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत तसेच विविध मंडया मध्ये त्यांचा मुक्त संचार असतो त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांचा भाजीपाला ही मोकाट जनावरे खातात व त्यांचे नुकसान होते.
महापालिकेच्या गुरे पकडणाऱ्या यंत्रणेचे व जनावर मालकांचे साटे-लोटे असल्यामुळे नागरिकांना व भाजीविक्रेत्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे शहर शिवसेनेने महेश धाराशिवकर प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
जर सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने झाला नाही तर संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याबाबत मनपा उपायुक्त घोलप यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या असून यावर अंमल न झाल्यास झालेल्या प्रकारास महापालिका जबाबदार असेल असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिला आहे .याप्रसंगी शहर उपप्रमुख संदीप बेळमकर रमेश पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.