30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रअझहरी प्रकरण : पाचजणांना अटक, घाटकोपरमध्ये पोलिसांवर दगडफेक

अझहरी प्रकरण : पाचजणांना अटक, घाटकोपरमध्ये पोलिसांवर दगडफेक

मुंबई : गुजरातच्या जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. मुंबई पोलिसांनी मौलाना अजहरी यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी घाटकोपर आणि विक्रोळी येथून आणखी पाच जणांना अटक केली आहे. या पाच जणांना नेत असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या दगडफेकीत चार-पाच पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

घाटकोपर पश्चिमेतून सलमान सईद, अजीम शेख आणि मोहम्मद शब्बीरलाल मोहम्मद यांना तर विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातून मोहम्मद बिलाल अब्दुल रहमान काझी आणि अब्दुल रहमान अब्दुल्ला काझी यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले चार आरोपी २१ ते ३२ वयाचे आहेत. तर एक आरोपी ६० वर्षांचा आहे.

आरोपींकडून दगडफेक
तीन आरोपींना घाटकोपरमधून घेऊन जात असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. एकामागून एक दगडांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात चार ते पाच पोलीस जखमी झाले. आरोपींनीच या पोलिसांवर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. तसेच या लोकांनी बेस्टच्या बसेसवरही दगडफेक केली. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR