24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन

ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन

परभणी : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार व आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे तपासणी शिबीर नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथे दि.८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी आ. डॉ. पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना करण्यात आली आहे. या जेष्ठ नागरीक मंचच्या ग्रामीण मतदार संघात संपूर्ण ठिकाणी तर परभणी शहरात ११८ ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. या जेष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून वेळोवेळी जेष्ठांसाठी शहरातील प्रभाग निहाय आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून मोफत औषधी देण्यात येत आहे. तसेच अनेक जेष्ठ नागरीकांच्या आर.पी. हॉस्पीटल पाथरी रोड परभणी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. याशिवाय जेष्ठ नागरीकांना ग्रामीण व शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी मोफत वर्तमानपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण मतदार संघातील जेष्ठ नागरीकांच्या पाठीशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेष्ठ नागरीक मंच खंबीरपणे उभा राहील्याने मोठा आधार मिळाला आहे.

या अनुषंगाने मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच आवश्यक मोफत सहाय्यक साधने देण्यात येणार आहेत. त्यासाठी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ८ व ९ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार चालण्याची काठी, कोपर काठी, अल्युमिनीयम कुबड्या, तीन पायाची काठी, चार पायाची काठी, श्रवणयंत्र, घडीचे वॉकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची, कमोड व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कृत्रीम दात, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, वॉकर, सिलीकॉन कुशन इत्यादी साहीत्य जेष्ठ नागरीकांची तपासणी करून पात्रतेनुसार मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या पार्श्वभुमीवर नुकतीच जेष्ठ नागरीकांची बैठक आ. डॉ. पाटील यांच्या शिवाजी नगर येथील संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी आ. डॉ. पाटील यांनी जेष्ठ नागरीकांशी त्यांच्या विविध समस्यांवर आपुलकीचा संवाद साधला. तसेच त्यांना आश्वासीत केले की, जेष्ठ नागरीक मंच व मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. तसेच मतदार संघातील जेष्ठ नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी होवून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आ. डॉ.पाटील यांनी यावेळी केले. शिबिराच्या अधिक माहितीसाठी जेष्ठ नागरीक मंच तालुकाध्यक्ष रामराव डोंगरे (८३०८४७०९८५) व आरोग्य समन्वयक राहूल कांबळे (९८२३२११०१०) यांच्याशी संपर्क साधावा.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR