35.2 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeलातूरकिनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने नृत्य स्पर्धा

किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने नृत्य स्पर्धा

किनगाव : वार्ताहर
लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या कलेला चालना मिळावी याकरीता जिल्हास्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यात उदगीर, औसा, रेणापूर,चाकूर, अहमदपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात प्रथम पारितोषिक १५००० हजार रु स्मृतिचीन्ह व सन्मानपत्र तर द्वितीय पारितोषिक ११००० हजार रु स्मृतीचीन्ह व सन्मानपत्र तर तृतीय पारितोषिक ७००० रु स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
या स्पर्धाचे उद्घाटन मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरंिसह घोणे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच सुमित्राबाई वाहूळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहूळे, सपोनी करीमखाँ पठाण, कुलदीप हाके, निजाम खुरेशी, शिवराज भुसाळे, आसिफ तांबोळी, आर. आर. बोडके हे उपस्थित होते तर रविवारी बक्षिस वितरण कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख असिफ कीन्नीवाले, माजी सभापती अयोध्या केंद्रे, माजी जि.प सदस्य त्र्यंबक गुट्टे, उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, याकूब शेख, माणिक नरवटे, गोंिवद गिरी, धम्मानंद कांबळे, धनराज बोडके, दिलदार शेख, पद्माकर हणमंते हे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते किनगाव जिल्हा परिषद प्रशालाच्या समूह नृत्यास देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते वयक्तिक नृत्य सादर केलेल्या प्राची सचिन गायकवाड व श्रमिका श्रीराम सूर्यवंशी या दोघींना विभागून देण्यात आले.  तृतीय पारितोषिक माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या समूह नृत्यास देण्यात आले. यावेळी पुणे येथील प्रसिध्द लावणी कलाकार लावणी सम्राज्ञी शिफा पुणेकर यांच्या लावण्यांची बहारदार मेजवानी मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किनगांव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे, उपाध्यक्ष असलंम शेख, सचिव जाकेर कुरेशी, सहसचिव अन्वर बागवान, समन्वयक शेटिबा शृंगारे, सदस्य रोकडोबा भुसाळे, रुद्रा मुरकुटे, रत्नाकर नळेगावकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वीरभद्र शेळके, ऋषी महाजन बस्वराज हुडगे, कौशल्या पवार यांनी केले तर प्रास्ताविक जाकेर कुरेशी व असलम शेख यांनी केले आभार गोरख भुसाळे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR