28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्र‘होनहार भारत - लीडरशिप माईंडसेट’ परिषदेचे आयोजन

‘होनहार भारत – लीडरशिप माईंडसेट’ परिषदेचे आयोजन

पुणे : प्रतिनिधी – डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीने ‘होनहार भारत – लीडरशिप माईंडसेट’ या संकल्पनेवर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. ८ ते १० फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.
शाश्वत आर्थिक प्रगती, सामाजिक विकास, पर्यावरण संवर्धन, सुशासन अशा विषयावरील मार्गदर्शन सत्रे, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या असे या राष्ट्रीय परिषदेचे स्वरूप आहे.

डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु डॉ. सायली गणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘क्विक हिल’कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर, इंटेलीमेन्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून समारोप कार्यक्रमात बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वूक्कलम, एक्सेंचर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कालगुडे उपस्थित राहणार आहेत. ‘होनहार भारत’ राष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR