सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं श्री ष ब्र वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची ६८ वी पुण्यतिथी साजरा करण्यात आला. संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर येथील प्राथमिक, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक, माध्यमिक प्रशालेत श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक व इंग्लिश मिडीयम शाळेत ज्येष्ठ शिक्षिका भारती पाटील यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सुनिता पवार यांनी पुज्य महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.यावेळी सहशिक्षिका जगदेवी रोडगे, कल्पना आकळवाडी, शुभांगी आडकी, दिपा कोरे, अनिता म्हेत्रे, सहशिक्षक जगदेव गवसने, प्रचंडे यांच्यासह अंगणवाडी शाळेतील शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. नेताजी माध्यमिक शाळेत धर्मराज बळ्ळारी यांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, विठ्ठल कुंभार,राजकुमार मरगूरे, काशिनाथ माळगोंडे, इरण्णा कलशेट्टी, शिवकुमार कुंभार, शिवानंद मेणसंगे, सुर्यकांत बिराजदार, अशोक पाटील, प्रकाश कोरे, मिनाक्षी वांगीकर,उमा कुंभार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत महेंद्र वाघमारे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बसवराज बिराजदार यांनी महास्वामीजींच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.यावेळी श्रेयस बिराजदार, किरण साळुंखे, लक्ष्मण कांबळे, शितल चमकेल, भौरम्मा रेके, मंगल स्वामी, आशाराणी गायकवाड, शारदा हबीब, रुपाली जवळकोटे, वंदना तेली,अमृता बोगा,बाळू पारशेट्टी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे यांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी चंद्रकांत पाटील, रेवणसिद्ध दसले, रोहित हत्तरके,शांतेश करजगी, शिवकुमार गवसने,सागर स्वामी, गुरुबाळय्या स्वामी, सचिन होटगे आदी उपस्थित होते.प्रसाद वाटपानी कार्यक्रमाची सांगता झाली.