28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवटेम्पो-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

टेम्पो-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धाराशिव : प्रतिनिधी
सुरतगाव शिवारात टेम्पो-दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी झाला. हेमंत संजय कुंभार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाणे येथे दि. ५ फेब्रुवारी रोजी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रोहीत उर्फ शाम कृष्णाथ सरवळे व हेमंत संजय कुंभारे दोघे रा. कासेगाव ता. द. सोलापूर हे दोघे दि.४ रोजी दुपारी दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकी सुरतगाव शिवारात शिवा गुंड यांच्या आंब्याच्या बागेजवळ आली असता टेम्पोने धडक दिली. आयशर टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून रोहीत सरवळे यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात रोहीत सरवळे हे गंभीर जखमी झाले. तर हेमंत संजय कुंभार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. या प्रकरणी रोहीत सरवळे यांनी दि.५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-२७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह मोवाका कलम १३४ अ, ब, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR