सोलापूर : शेजारच्या कर्नाटकात कलबुर्गीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची झालेली विटंबना आणि अक्कलकोट तालुक्यात दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात अक्कलकोटमध्ये दलित संघटनांनी एकवटून आक्रोश मोर्चा काढला. या मोर्च्यातून मोठे शक्तिप्रदर्शन झाले. भीम नगरातून निघालेल्या या आक्रोश मोर्च्यात हजारो जनसमुदाय सहभागी झाला होता. विविध मार्गावरून चालत हा मोर्चा एवन चौकात येऊन विसर्जित झाला.
हलग्यांचा कडकडाट आणि जय भीमच्या घोषणांसह जाहीर सभेत आठवले प्रणीत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, अजय मुकणार, सुहानी मडिखांबे, संदीप मडिखांबे सागर सोनकांबळे, विठ्ठल आरेनवरू, यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगळे, सिद्धार्थ गायकवाड, माजी नगरसेवक विजय मुकणार, किशोर खरात,सचिन बनसोडे, तुकाराम दुपारगुडे, राहुल रुही आदी सहभागी झाले होते. मोर्चेक-यांनी नायब तहसीलदार विकास पवार यांना निवेदन सादर केले.