सेलू : बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीत सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई येथील अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सेलूचे एक बडे प्रस्थ माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे आपल्या शेकडो समर्थक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असून या संदर्भातील वृत्त नुकतेच दैनिक एकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार पुष्टी मिळत असून सेलूच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळणार आहे. त्यांच्या या अजित पवार गटातील प्रवेशामुळे महायुतीला बळकटी मिळणार असून त्याचा परिणाम लोकसभेला देखील होणार आहे.