25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरडीजीसीए कडून परवाना मिळाल्यावर विमानसेवा सुरू होईल

डीजीसीए कडून परवाना मिळाल्यावर विमानसेवा सुरू होईल

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर :
सध्या विमानतळावर सुरू असलेली महत्त्वाची कामे जून-जुलैपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर डीजीसीए कडून विमानसेवा सुरू करण्याचा परवाना लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परवाना मिळण्यापूर्वी डीजीसीए सह राज्यातील महाराष्ट्र विमानसेवा विकास महामंडळाचे अधिकारी येवून सोलापूर विमानतळाची पाहणी करतील. त्यानंतर त्यांच्याकडून परवाना मिळेल आणि मग विमानसेवा सुरू होईल.असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगीतले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) विमानसेवा सुरू करण्याचा परवाना मिळेपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही. त्यांच्याकडून परवाना मिळावा, यादृष्टीने विमानतळावर सध्या युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. ही कामे जून-जुलैपर्यंत संपतील आणि त्यानंतर परवान्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव जाईल. त्यांच्या परवानगीनंतर सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर विमानतळ सुरू होण्यापूर्वी तेथील पाण्याचे कनेक्शन, धावपट्टी, संरक्षण भिंत, ड्रेनेज, प्रवासी टर्मिनल, प्रशासकीय इमारत, वाहनतळ अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच विमानतळाचे विस्तारीकरण करून दोन विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था, अद्ययावत फायर फायटिंग स्टेशन, फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर अशा बाबींचीही उभारणी होणार आहे.

सध्या संरक्षक भिंत, पाणी-ड्रेनेज लाइन व धावपट्टीची कामे सुरू असून, ती जून-जुलैपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील हालचालींना गती येणार आहे. दरम्यान, विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक चँम्पला बानोत यांनीही जिल्हाधिकारी जे म्हणतात तसेच होणार आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी विशिष्ट निमयावली असते आणि त्याची परिपूर्ती झाल्याशिवाय सेवा सुरू होत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विमानसेवा निश्चितपणे सुरू होणार आहे, पण कधीपासून हे सध्यातरी सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री कार्यालयाकडून सोलापूरचे होटगी रोड विमानतळ ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होऊ शकते. तसेच उडान अंतर्गत अलायन्स एअर कंपनीची (ए. टी. आर- ७२) विमानसेवा सोलापूर- हैदराबाद अशी सुरू करता येऊ शकते, असे पत्र पीएमओ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी दिली. सोलापूर दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन करण्यासंबंधीचे पत्र आपण पंतप्रधानांना लिहिले होते, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR