34.2 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeसोलापूरअल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात

सोलापूर : अल्पवयीन बालिकेला आमिष दाखवून पळून नेल्याप्रकरणी एकाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात २१ जून २०२२ रोजी ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असून पुण्यातील अल्पवयीन बालिकेस संशयित आरोपी कुणाल भीमराव सावंत याने आमिष दाखवून पळून नेले होते. याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी गुन्ह्यातील बालिका व संशयित आरोपी यांचा जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील तपासिक अंमलदार यांनी तपास सुरु केला. हे प्रकरण १ ऑगस्ट २०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास कामी वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यातील गुप्त बातमीदारामार्फत अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने कसोशीने तपास करून कुणाल भीमराव सावंत याला बुधवार पेठ सोलापूर येथे शिताफीने शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR